Rohit jay hind

Tragedy

3  

Rohit jay hind

Tragedy

2020 गोष्ट एका प्रवासाची

2020 गोष्ट एका प्रवासाची

2 mins
266


जग हे नवीन वर्षाच्या तयारीत होते. नवीन वर्ष येणार, म्हणून सर्व आनंदात होते. पण कुणालाच माहित नव्हते की, हे नवीन वर्ष आपल्याबरोबर काय घेऊन येणार आहे. मोहित आणि माधुरी सुद्धा नवीन वर्ष येणार म्हणून आनंदात होते. चार वर्षांपूर्वी मोहित माधुरीला घेऊन मुंबईत आला होता. मुंबईमध्ये मोहित माधुरी आणि त्यांची दोन मुले राहत होती. छोटेखानी कुटुंब मुंबईमध्ये राहायला लागले. नवीन वर्षासाठी नवीन वर्षामध्ये सर्वांनी खूप काही करण्याचे ठरवले होते. अगदी तसेच मोहित आणि माधवीने सुद्धा आपल्या मुलांच्या शाळेच्या प्रवेशासाठी पैसे साठवून ठेवले होते. नवीन वर्षाला सुरुवात झाली व दिवस चांगले जाऊ लागले. परंतु कुणालाच माहीत नव्हते की सातांसमुद्रापार चीन या देशामध्ये एक व्हायरस जन्माला आला. मार्चच्या सुरुवातीला या वायरस ने भारतामध्ये प्रवेश केला. हळूहळू त्याने आपली मुळे भारतामध्ये रोवण्यास सुरुवात केली. एके दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी कोरोना चा प्रसाद भारतामध्ये होऊ नये, म्हणून त्यांनी रात्री 8 वाजता प्रसारमाध्यमांद्वारे म्हणून त्यांनी 22 मार्च रोजी भारतामध्ये जनता कर्फ्यू ची घोषणा केली.

  कधीही बंद न राहणारा भारत 22 मार्च रोजी बंद झाला होता. 24 तास चालणारी मुंबई सुद्धा अखेर बंद पडली. कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली लॉकडाऊन मुळे सर्व कंपन्या व कामे सुद्धा बंद झाली होती . त्यामुळे मोहितचे काम सुद्धा बंद पडले .माधुरीच्या बचतीवर घर कसेबसे चालत होते.पण आता लॉकडाऊन काही संपायचे नाव घेत नव्हते. त्यामुळे आता पुढे काय करावे हे दोघांना सुचेनासे झाले. काही समाजसेवक घटकांनी लॉकडाऊन च्या काळात सर्व गरजू व्यक्तींना मदत केली. मोहित सुद्धा घरासाठी बाहेर फिरून थोडेफार रेशन आणत असे. या काळात बाहेर गेल्यामुळे मोहितला कित्येक वेळा पोलिसांच्या हातचा प्रसाद खावा लागला.

    महिन्यावर महिने गेले आता घर चालवणे कठीण झाले होते. आर्थिक अडचणींमध्ये आता घर कसे चालणार, याची चिंता  माधुरीला सतावत असे. लॉकडाऊन मुळे खोली भाडे सुद्धा रखडले होते. त्यामुळे घर मालकाचा फोन सतत येत असे. शेवटी मोहितने निर्णय घेतला की, आता आपला मुंबईमध्ये राहणे अवघड आहे. त्याने गावाला जायचा निर्णय घेतला तो रोज बातम्यांमध्ये गावाला जाणाऱ्या लोकांची दशा बघत असे. पण आता पर्याय नव्हता. गावाला जाण्यासाठी कुठे वाहन मिळेल का? याच्या शोधामध्ये मोहित फिरू लागला. पण कुठे वाहन मिळेनासे झाले. आता मैलांचा प्रवास कसा करावा.सोबत दोन लहान मुलांना घेऊन आता मोहित ने पायी प्रवास करण्याचे ठरवले. काळजावर दगड ठेवून त्याने मुंबई सोडली. समोर होता मैलोन् मैलांचा खडतर प्रवास आणि प्रवासामध्ये होणारे हाल हे तो जाणून होता. पण आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याचा निर्णय पक्का झालेला होता.

आपलं सामान माधुरीच्या मावशीच्या घरी ठेवून मुलाबाळांना घेऊन दोन बॅग घेऊन तो गावच्या रस्त्याने निघाला. हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. ठीक ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवले पण मोहित थांबला नाही, तो बायका-मुलांना घेऊन चालतच राहिला. वाटेत एक विठ्ठलाचे मंदिर त्याला दिसले. लॉकडाऊनमुळे मंदिर सुद्धा बंद होते. मोहित मंदिरा बाहेरूनच देवाला नमस्कार करतो आणि बोलतो, "आला आहे भक्तावर प्रसंग वाट तूच दाव.. पांडुरंग घेऊन लेकरा बाळाला चाललोय गावाला... आशीर्वाद राहू दे, घरी सुखरूप जाऊ दे.... हीच इच्छा आज तुला मागतो मी पांडुरंगा"


Rate this content
Log in

More marathi story from Rohit jay hind

Similar marathi story from Tragedy