पोटासाठी
पोटासाठी


कुटुंबाची वाटे चिंता
पोटासाठी दाही दिशा
आहे नोकरी आपली
जगण्याची एक आशा
पळापळ सारी करी
जीवा लागे लई घोर
तान्हुल्याला दूर ठेवी
करी त्याचाच विचार
बघताच पापी घेई
दुःख जाई विसरून
उद्यावर टाकी काम
झोप येई कंटाळून
कष्ट करू खूप सारं
तवा मिळते भाकर
नाही जीवाला आराम
सारे काही वाटे न्यारं
लाज कशी वाटू नये
कमी पडतो पगार
पाय खेचती हे लोक
वाढे महागाई फार
सुखासाठी कुटुंबाच्या
आधी चटके जीवाला
कधीकधी वेळ येई
काढी चिमटा पोटाला
जळे आता मन लई
कशासाठी पळापळ
पोटासाठी सारं खरं
रक्त होई सळसळ