STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy Others

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Others

मजुरांची व्यथा- पोहचेल का घरी?

मजुरांची व्यथा- पोहचेल का घरी?

1 min
11.7K

वाट जीवघेणी पण चालायचा निर्धार आहे

हाती उरले काहीच नाही पण मनात निश्चय आहे

उन्हाचा गोळा माथ्यावर घेऊन वणवण रस्ता पार करतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे

पोटातली आग थुंकी गिळत विझवत आहे

खांद्यावरच्या तान्हुल्याला बघून जीव तळमळतो आहे

दोन घास त्याला मागण्या कमवता हात आज पसरतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे

आजाराचा कहर, दुःखाचा डोंगर

डोळ्यांत अश्रूंची किनार घेऊन मैलोनमैल काटेरी वाट तुडवत आहे

केविलवाण्या बायकोच्या नजरेला हातात हात घेऊन आधार देत आहे

माणुसकी आटलेल्या जगात भेगाळलेल्या

जखमा चिंध्यात बांधून हसतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे      


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy