STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational Others

4  

Ganesh G Shivlad

Inspirational Others

असे होते माझे शिक्षक...!

असे होते माझे शिक्षक...!

1 min
339


माझ्या बाल मनाला घडवले अन् त्यांनीच शिकवली आणि दाखविली दिशा..!

ज्ञानाची शिदोरी पदरी बांधून माझ्या, त्यांनीच दिली मला दीक्षा..!

वेळप्रसंगी मी चुकल्यावर, केली ही त्यांनी मला शिक्षा..!

पण त्यांनीच दिली मला, जगण्यासाठी खरी ज्ञानाची भिक्षा..!


ते मला मूर्ख म्हणाले, पण या मुर्खाला शहाणे पण त्यांनीच केलं..!

ते मला बैला म्हणाले, पण बैलासारखे कष्ट करून मोठं व्हायचं त्यांनीच शिकवलं..!

त्यांनी माझा कान सुद्धा पिळला, पण समाजात ताठ मानेने जगण्यास त्यांनीच शिकवलं..!

ते माझ्यावर रागाने खुप भडकले, पण राग आल्यावर सुद्धा डोकं शांत ठेवून कसे वागायचे, हे त्यांनीच तर शिकवलं..!

त्यांनी माझ्या दोन्ही हातांवर छड्या मारल्या, पण हातात लेखणी कशी धरायची, हे त्यांनीच शिकवलं..!


पाठीत बदाबदा बडवले, पण पुन्हा पाठीवर कौतुकाची थाप देऊन शाबासकीही त्यांनीच दिली..!

त्यांनी मला शाळेत कोंबड बनवलं पण जीवनाची कब्बडी खेळायला त्यांनीच मला शिकवलं..!

त्यांनी मला वर्गात नेम धरून खडू मारला, पण अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला आणि वाईट गोष्टीपासून नेम चुकवायच ज्ञान त्यांनीच मला दिलं..!

त्यांनी मला कविता पाठ झाली नाही, म्हणून वर्गात बेंचवर उभे केले, पण आज ही कविता लिहायला माझ्या पंखात बळ त्यांनीच भरले..!


त्यांनी मला शब्दांचा मार ही दिला, पण शब्दांची जादू आणि रांगोळी ही शिकवली..!

असे होते माझे शिक्षक..! 

त्यांनी मला शिक्षा दान केली पण चुकल्यावर शिक्षासुद्धा केली..!

आणि आज त्यांचे मुळेच घडलो आहे..!


आकार दिला कच्च्या मातीला या अन् घडवले सुंदर मडके..!

ज्ञानाच्या भट्टीत भाजून, खुप बनवले पक्के..!

अन् नंतर धोपटून ही पाहिले.. झाले पक्के का आहे कच्चे..!

अन् पुन्हा मायेने थोपटले सुद्धा, तेच आहेत माझे गुरुदेव सच्चे..!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational