Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

|| मी पावसास घाबरतो||

|| मी पावसास घाबरतो||

1 min
13.6K


मी पावसास घाबरतो, का उगा मनातली भीती|

तो उधळीत येतो वारू, ये गुलाल माती वरती||

 

उगा घोर जीवाला लावी, त्याचे वेळी-अवेळी येणे|

कधी भर उन्हाचे येणे, मग भिजून सारे जाणे||

 

 का ढगात नव्हते पाणी, की, धुक्यात दिसले नाही|

का जलधार भुईवर येण्या, त्याने टोलच भरला नाही||

 

का खिशात नव्हता, पैसा, की कर्ज मिळाले नाही|

का मुद्दाम उशिराने येतो, की वाट सापडली नाही||

 

 आता यानेच मला सांगावे, मी शेतात कसे राबावे|

जमवून ढगांचा मेळा, कधी धरणीवर उतरावे||

 

ज्योतिष संगती होरा, उद्या पाऊस येईल थोडा|

पण भलतेच घडून जाते, जसा नाचत येतो घोडा||

 

 हे असेच सारे घडते, हा भलतीकडेच पडतो|

रणरणत्या उन्हातही, चौखूर असा उधळतो||

 

मग कधी अवेळी येऊन, गाव वाहुनी नेतो|

त्या रौद्र रुपाला पाहून, मी पावसास घाबरतो||

 

 


Rate this content
Log in