Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

1.0  

Trupti Naware

Others

तो...पाऊस

तो...पाऊस

1 min
319


निळ्या आकाशी

काळ्या मेघांशी

हिरव्या गाण्यास

भिजवून गातो

रुपेरी वाळुशी

किनारीच्या धारेशी

मैञीचा धागा

बांधूनी जातो

निळ्या अंधारात

मातीच्या गंधात

मोराचं स्वप्न

साकारुन जातो

पाण्याच्या धारेत

सरींच्या थेंबात

स्वातीचा मोतीही

चमकून जातो

भर पावसात

भिजत भिजत

नुसतच डोळ्यात

पहात पहात

तो येऊन

निघुन जातो

गारवा देऊन

डोळ्यास भुलवुन

अवचित असाच

निघून जातो...

अवचित असाच तो...

निघून जातो..!!!


Rate this content
Log in