पहिली नजर १
पहिली नजर १
कॉलेजचा पहिल्या दिवस. नवीन वातावरण, नवीन चेहरे सगळं काही नवीन होतं. पण यात एक अनोळखी पण ओळखीचा चेहरा मनामध्ये घर करून राहील याची आरोहीला कल्पना देखील नव्हती.
आरोहीचा कॉलेजचा पहिला दिवस होता. मनामध्ये उत्साह, दडपण, आनंद, गंभीरपणा सगळंच काही एकत्र झालं होतं. वर्गात सगळे विद्यार्थी हजर होते. एकमेकांसाठी सगळे नवीन असल्याने वर्गात बऱ्यापैकी शांतता होती.
देशपांडे सर आत आले. "हॅलो मित्रांनो कसे आहात? आपला प्रथम वर्षाचा आणि कॉलेज लाईफचा पहिला दिवस कसा वाटत आहे सर्वांना?" चेहऱ्यावर गोड हास्य ठेवून देशपांडे सरांनी मुलांना विचारलं.
काही विद्यार्थी लाजून काहीच बोलले नाही, काहींनी होकार्थी मान हलवली, काहींनी एका स्वरात 'खूप भारी वाटत आहे सर' म्हणाले. देशपांडे सर सर्वांची ओळख करून घेत होते, स्वतःबद्दल सांगत होते.
"मी तुम्हाला मराठी विषयाला प्राध्यापक आहे. तुमच हे बी.ए च पहिलं वर्ष असल्याने काही गोष्टी माहित नसतील त्यामुळे काही अडचण आली; तर माझ्याशी संपर्क साधा. मी त्या क्षणी हजर असेल. मुलांनो तुमचं हे नवीन आयुष्य सुरू होतय, आयुष्याला एक नवा आकार मिळणार आहे त्यामुळे खूप अभ्यास करा, कोणाला काही घाबरू नका, काही गरज लागली तर मला किंवा इतर प्राध्यापकांना सांगा, आम्ही सगळे हजर असेल."
एवढे प्रेमाचे चार शब्द बोलून देशपांडे सर ऐका ऐकला नाव आणि माहिती विचारत होते. "हं, काय नाव तुझं?" देशपांडे सरांनी आरोही ला विचारलं. आरोही गडबडीने उठून बोलली "आ...आरोही"
"काय?"
"आरोही पाटील"
आरोही घाबरत आणि लाजत बोलली. देशपांडे सर तिच्या जवळ येऊन बोलले
"खूपच नाजूक आवाज आहे तुझा काहीच ऐकू आलं नाही मला तर"
आरोही शांतपणे मान खाली घालून ऐकत होती.
"अच्छा ओके माझ्या कानात सांग तुझा आवाज हळू आहे तर"
देशपांडे सर हसत बोलले हे ऐकताच वर्ग हसू लागला.
तेवढ्यात दरवाज्याच्या साईडला एक मुलगा शांतपणे थांबला होता. कदाचित लेट झाला असेल यायला. त्याने 'आत येऊ का?' असं काहीच विचारलं नाही फक्त दरवाजाच्या साईडला उभा होता. देशपांडे सरांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.
"या साहेब या पहिल्याच दिवशी उशिरा?" देशपांडे सरांनी खट्याळ स्वरात त्याला विचारलं. तो मात्र शांतपणे येऊन एकटा बसला. तो मुलगा दिसायला सुंदर, गुढ, शांत होता.
पहिला दिवस असल्याने एकच लेक्चर झालं. आरोही बस स्टॉप वर बसची वाट बघत होती. तिच अचानक लक्ष एका मुलाकडे गेला. पांढरा शर्ट, विस्कटलेले सुंदर केस, चेहऱ्यावर गूढपणा आणि शांतता. तेव्हा तिच्या लक्षात आलं
"अरे हा तोच आहे ना जो आज वर्गात लेट आला होता माझ्या वर्गातला आहे वाटतं." हा विचार करताना त्याच लक्ष तिच्याकडे गेल दोघे एकमेकांकडे बघत होते. ती पहिली नजर...त्या क्षणी आरोहीचे हृदयाचे ठोके दुप्पट वाढू लागले..!!!

