भूत
भूत
२००३ मध्ये आलेल्या 'भूत' या चित्रपटानं प्रेक्षकांची झोप उडवली होती. राम गोपाल वर्मा याचं दिग्दर्शन असलेला हा हॉररपट तेव्हा गाजला होता. अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अभिनयानं 'भूत' या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. एका पछाडलेल्या घरात नवीन दाम्पत्य आल्यानंतर काय काय घडत जातं, ते का घडतं याची कहाणी 'भूत' आपल्यासमोर मांडतो. वर्मा यांचा हा दुसराच हॉररपट असला तरी संगीत, दिग्दर्शन, दृश्य आणि अभिनय ही भट्टी उत्तम जमून आली होती. चित्रपटातील उर्मिलाच्या कामगिरीनं अनेकांची वाहवा मिळवली. त्याचबरोबर उर्मिलानं अनेक पुरस्कारसुद्धा पटकावले. साचेबद्ध हिंदी चित्रपटाच्या चौकटीतून बाहेर पडणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता, ज्यात एकही गाणं नव्हतं. या चित्रपटाचे तामिळ आणि तेलुगूमध्येही रिमेक तयार झाले.

