STORYMIRROR

Kalim Shaikh

Drama Inspirational Others

4  

Kalim Shaikh

Drama Inspirational Others

आक्रोश धरणीमातेचा

आक्रोश धरणीमातेचा

1 min
0

आक्रोश धरणीमातेचा...

बाबा, शरीररूपी अस्तित्वाला
या धरणीमातेची कूस दिलीस तू,
तिच्या गर्भात अनेक जीव वाढले
लहानाचे मोठे झाले.

त्या आईचं प्रेम किती अफाट आहे,
माझं अख्खं शिवार तिच्याच प्रेमाने फुललं आहे,
पण मी एकटा काय करू, सांग ना बाबा?
सह्याद्रीचा माथा आता वाळवंटात जमा झाला आहे.

ज्या आईने लेकरं वाढवली,
आता त्यांचीच कत्तल होताना पहावी लागते,
हे धरणीमाते, जानकी, माता सीते,
तुझ्यातला ओलावा नको संपवूस...
बघ ना ग आई, तू बंजर होत चाललीस!

माता, तू मला पाय मातीत ठेवून
आकाशाला गवसणी घालायला शिकवलंस,
शेवटी तुझ्यातच सामावून एकरूप केलंस.
बघ ना ग, पाणी पण संपू लागलंय हळूहळू,
घसा कोरडा पडू लागलाय...

आये, या रावणाला तूच शिक्षा दे,
अगं आमचा श्वासच पणाला लागलाय,
पण स्वार्थापुढे आंधळ्या झालेल्या जमातीला
काहीच दिसेनासं झालंय!

माझं स्वराज्य पारतंत्र्यात चाललंय ग,
मी कुठं शोधू शिवबांना, सांग ना?
बाजीप्रभूंचं शीर नसताना अनेकांना धारातीर्थी पाडलं,
त्या बाजीप्रभूंना कशी हाक देऊ?

तानाजीराव, आपल्या स्वराज्याला तुमची गरज आहे,
या मातीचा गर्भच काढून घेऊ लागलेत.
माझ्या माईच्या मायेपासून मला दूर होण्यापासून वाचवा,
वृक्षतोड थांबवा रे थांबवा...
आये, ये माझी माय...!

- कवी कलीम शेख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama