STORYMIRROR

Sanjay Gurav

Tragedy Others

3  

Sanjay Gurav

Tragedy Others

येऊ नकोस आता..

येऊ नकोस आता..

1 min
11.6K

येऊ नकोस आता 

गेलीस एकदा स्वतः

नकोच सोडवू कधीही

तुझा आवडता गुंता


गुंतायची हौस भारी

सुटायची आस न उरी

धरावे सोडावे उमजेना

कुठे वारा कुठे छत्री...


फरक नात्यातला कळेना

स्वार्थ परमार्थ आकळेना

नजर धुसर स्वतःची परी 

दोष कुणाला द्यावा ठरेना..


जगण्याची आस बाकी तरी

रीत कोणती वाट कुठली?

येऊच नको परतुनी पुन्हा

वाट तुझी नव्हेच ,ती मुकली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy