विसावा
विसावा


तुला पाऊस हवा होता
मला... पावसात विसावा
वर अधिकचा अट्टहास,
मी जरा राजसच दिसावा
पण...
राजबिंडा माणूस,
पावसात भिजतही नाही
आणि विसावतही नाही
त्याला मुळी याची बरं का
परवानगीच नाही... आता?
आली ना पंचाईत?
पाहा ना घाईत
हो जरा सराईत
गेलेले पावसाळे गडे,
परत येत नाहीत आणि
आलेच तर... सगळेच
असाच आनंद देत नाहीत
म्हणून... तुझा पाऊस आणि
माझा विसावा... दोन काळजं,
हेतू मात्र हा... एकच असावा