उदकदान
उदकदान




दवबिंदूंचे स्फटिक लेवूनी,
प्रितफुले हसत आली..
तिमिर छेदुनी..धुके विरूनी,
सोनेरी किरणे स्पर्शली...! १.
नाते धरतीशी जोडूनी,
फेर मेघ मालांनी धरले..
ताल नृृपुरी पावसानी,
गान कोळवे झरू लागले...! २.
अचंबित या दिगंतराळी,
योग स्वच्छंदी योगाचे..
अन साक्षीला खुशाल हसे,
गोल कडे ते इंद्रधनुचे...! ३.
शुभ्र सकाळी मंतरलेल्या,
वार्यातूनी पहाटेने रिमझिमावे...
त्या नभानेही या भूमीला,
उदकदान असे द्यावे...! ४.