ते क्षण तुला आठवतील
ते क्षण तुला आठवतील


तुझ्या वाटेवर विसावलेले माझे डोळे
तुला पाहतास हसू उमटणारे ओठ
तुझ्या वर प्रेम उधळून टाकणारे हृदय
ते क्षण तुला नक्कीच आठवतील
तू प्रेयसी म्हणताना बावरलेली मी
तुझ्या डोळ्यात हरवलेली मी
तू आला नाही तेव्हा रडलेली मी
ते क्षण तुला नक्कीच आठवतील
तुझ्याच विचारात हरवणारी मी
तुझा विषय निघताच लाजणारी मी
तुझ्याबद्दल सतत बोलणारी मी
ते क्षण तुला नक्कीच आठवतील
बाहुपाशात तुझ्या ऊब शोधणारी मी
मिठीत तुझ्या अलगद विरघळणारी मी
स्पर्श तुझा हवाहवासा वाटणारी मी
ते क्षण तुला नक्कीच आठवतील
तू झिडकारताच रूसणारी मी
तू अविश्वास केल्यावर रडणारी मी
तूला प्रेमच नाही कळल्यावर झुरणारी मी
ते क्षण तुला नक्कीच आठवतील
नसेल जेव्हा मी जाणवेल माझे प्रेम
नसेल जेव्हा मी पटेल माझे प्रेम
नसेल जेव्हा मी हवेसे वाटेल माझे प्रेम
ते क्षण तेव्हा तुला नक्कीच आठवतील