स्वप्नी मृगजळ
स्वप्नी मृगजळ
भोग भोगते दु:खात
खिन्न मन रात-दिन,
घेत झुला आठवांचा
झंकारते सुर-तान...! १.
मज साहवे न आता
तव दुराव्याच्या झळा,
मम स्वर्णकांती देही
येत वेदनांच्या कळा...! २.
विष प्याला विरहाचा
हुंदक्यात पचविते,
घोट घोट प्राशिताना
भास तुझा भासवते...! ३.
ओढ तुझीच मनाला
प्रीतगंध..दरवळ..!,
फुले ही जीवनबाग
स्वप्नी आशा मृगजळ....!! ४.