सुखांताचा शोध
सुखांताचा शोध
1 min
258
काटे अन पाकळ्या
अंतर आहे ही
अंतर नाही ही
काट्यांशी खेळत
पाकळ्यात मिसळत
जगण्याचा रंग
गहिरा हवा ही अन
गहिरा नकोही
शुभ्रतेची छटा हवी
शुद्धतेचा दिवा लखलखता हवा
काजळीची किनार हवीही
अन नकोही
काट्यांचे बोचणे
पाकळ्यांचे सोहळे
जगणे असेही जगणे तसेही
सुखांताचा शोध असाही कसाही