STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

सोड लाचारी

सोड लाचारी

1 min
51

बदलून गेली दुनिया, बदलली दुनिया सारी

सोड सोड मातंगा तुझी लाचारी...

दाही दिशांत वाजेल डंका अशी हवी कामगिरी

पंखात आहे बळ तुझ्या तू घे गगनभरारी..

जिवनात तुझ्या बघ किती हा अंधार

गेल्या किती पिढ्या नाही झाला उध्दार

असा रुतून चिखलात राहणार तू कुठवरी..


सोसणार अजून किती तू अन्याय?

ऊठ,लढ पेटून हवा तुला न्याय

ऊठ मर्दा पाड मुडदा नको गुलामगिरी. .


फकिरा, लहुजी, अण्णा भाऊ ची शपथ तू घे

चल एक संघटित होऊन ललकारी दे

ऊठ ठोक दंड आहे वेळ हिच खरी...


विसंबून राहू नको मुळीच कुणावर

तुलाच करायचा आहे तुझा उध्दार

तु आहेसच खरा साऱ्या जगाला या भारी..


महान तुझा इतिहास दाव जगाला पराक्रम

ऊठ वाघा,कळू दे जगा दूर होऊ दे सारे भ्रम

लहुजी विरा,ऊठ फकिरा चल दे ललकारी..

सोड सोड मातंगा तुझी लाचारी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational