STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

सारे काही पोटासाठी

सारे काही पोटासाठी

1 min
7

पोर बांधून उराशी

घेई घमेलं डोक्याशी

असे त्यातही पोटुशी

कशासाठी पोटासाठी !!  (1)


आला सांगावा कामाचा

येण्या झणी कामासाठी

उठे बिगीने रखमा

कशासाठी पोटासाठी !!  (2)


गाठे लोकल घाईने

घोर गर्दी दाटीवाटी

चढताना रेटारेटी

कशासाठी पोटासाठी !!  (3)


राही दूरच्या ठिकाणी 

सय आणी डोळा पाणी

बाळा सांभाळण्या दाई

कशासाठी पोटासाठी !!  (4)


कामे घरची उरकी 

छोटा संगणक हाती

सत्वपरीक्षाच तिची

कशासाठी पोटासाठी !!   (5)


कष्ट तिचे अविरत

प्रपंचाच्या पोटासाठी

ओठ घट्ट मिटलेले

शांती, समाधानासाठी !!(6)


Rate this content
Log in