STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

प्रश्न आहे

प्रश्न आहे

1 min
379


जातीचा ना धर्माचा

सत्तेचा ना पैशांचा

असण्याचा ना नसण्याचा

प्रश्न आहे समजून घेण्याचा


देण्याचा ना घेण्याचा

पोटाचा ना राहण्याचा

सर्वकाही मुबलक इथे

प्रश्न आहे वितरणाचा


पडण्याचा ना पाडण्याचा

रडण्याचा ना रडवण्याचा

घडण्याचा नि बिघडण्याचा

प्रश्न आहे संस्काराचा


जगण्याचा ना भोगण्याचा

पापाचा ना पुण्याचा

स्वर्गाचा चा नरकाचा

प्रश्न आहे माणुसकी हरवल्याचा


महागाईत भागण्याची ना जगण्याची

रोजच मन मारून जगू कसंही

प्रश्न , चिंता आहे पुढच्या

पिढीच्या अंधःकारमय भविष्याची ...


Rate this content
Log in