पावसाचे रुप न्यारे
पावसाचे रुप न्यारे
कोकिळीचे गाणे तूझी चाहूल घेऊन आले
थेंब पावसाचे मन चिंब भिजवून गेले
ओल्या मातीत पेरलेली बीज अंकुरली
साचलेल्या पाण्यात नौकांची रांग सजली
आगमनाने तुझिया बहरले सारे मळे
हिरव्यागार शिवाऱ्यांनी मळभ दाटून आले
भेगाडलेल्या धरणीच्या डोळ्या स्वप्ने ओली
आसुललेल्या नयनांची तृष्णा तृप्त झाली
दिवसागणिक बदलणारे रुप तुझे पाहता
हलकेच तुझ्यात रमणारे मन उदास झाले
कधी रिमझिम कधी मुसळधार बरसणारे
सोंगाड्यापरि रुप तुझे मला नकोसे झाले
अनपेक्षित पुराचे धक्के आता सोसवेना झाले
त्सुनामीचे विक्राळ रुप पाणावले नेक डोळे
माणसाच्या करणीची चांगलीच अद्दल घडवली
मुंबई, चेन्नई सह कोल्हापूरातही त्राही माजली
असे पावसाचे रुप आणखी किती वर्णावे
स्वच्छंदी तु, तुला कवितेत कसे बांधावे
नेक रुपे तुझी एका कवितेत माझ्या माहवेना
तुला लिलिल्याखेरीज माझ्या लेखणीला राहवेना