पाऊस...तुझा..माझा...!
पाऊस...तुझा..माझा...!


तो असा अवचित येतो अन्,
मन चिंब-चिंब करूनी जातो..
तापलेल्या या माझ्या मनावर,
जणू ओलेती फुंकर घालतो... १.
भिजत जाता वर्षावात त्याच्या,
मग..माझी मी न उरते..
इथे तिथे चोहिकडे तुलाच,
उगाच शोधत राहते...! २.
तो मात्र लबाड हसतो,
नकळत जलधारांचा वर्षाव करतो..
प्रयत्न करते मिठीत घेण्या त्याला,
कवेतूनी तो निसटून जातो..! ३.
जाता जाता गालावर मात्र,
हळूच खूण ठेवून जातो..
वर्षावात बेभान असता मी,
पाऊलखुणा त्याच्या ठेवून जातो... ४.
उलगडतो देहावर हा,
ओलेता...मग...पिसारा...,
मांडून मी ही बसते,
मग आठवणींचा पसारा...! ५.
पाऊस तुझा,पाऊस माझा..,
या चिंब-चिंब देहावरचा...