Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Others Tragedy

2.5  

Rajesh Sabale

Others Tragedy

पाहून रूप तुझे विठ्ठला

पाहून रूप तुझे विठ्ठला

1 min
13.6K


पाहून रुप तुझे मी, मज विसरलो।                             

साठविता मनात माझ्या ते, मी माझा न उरलो।।धृ०||

 

दोन्ही कटीवरी हात, का रे विटेवरी उभा|

राजा पंढरीचा माझा, भीमा तीरी उभा||

काय तुझे रूप देवा, कानी कुंडले मासोळी|

गळा मोतियांचे हर, लावी मळवट भाळी||

कटी पितांबर जरीचा, मी पाहून भुललो|

पाहुन रूप तुझे मी, मज विसरलो||१||

 

आषाढी कार्तिकीला तुझा, लई गजर चालतो|

थंडी, वाऱ्या पावसात, भक्तांसंगे तू नाचतो||

तुझ्या दर्शनाला भक्त, लाख लाख जाती-येती|

सर्व जात-धर्माचे जन, तुज आपला मानती||

काय तुझी किमया देवा, मी एकूण भुललो|

भाव भक्तीच्या नादात, देहभान विसरलो||२||

 

एक मनातील खंत, तुज सांगू का रे बापा|

तुझ्या आशिर्वादाने रोज, नेता मारी थापा||   

तुझ्या गाभाऱ्यात चोरी, तरी उगा का रे उभा|

तुला घाबरेना कोणी आता, लई झाली शोभा||

तुझे गुणगान गाण्यासाठी, रातदिन रे बैसलो|

तुझा चमत्कार पाहण्यासाठी, मी मज विसरलो||३||


Rate this content
Log in