STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

नांगर (सहाक्षरी)

नांगर (सहाक्षरी)

1 min
11.6K

लोखंडाचा फाळ

जमीन चिरत

चाललाय पुढे

ढेकळ फेकत


जोर लावलाय

दोन्ही हात असा

संसाराचा गाडा

हाकायचा तसा


उन्हाचा तडाखा

डोईला रुमाल

शेत नांगरणी

करते खुशाल


घरादारावर

नकोच नांगर

शेतात कष्टते

होऊन खंबिर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational