माझ्यात हरवून जा..!
माझ्यात हरवून जा..!


लपलीस हृदयात माझ्या, थोडी बाहेर डोकावून जा..!
थोडासा का होईना पण आज भाव खाऊन जा..!
शोधीले तुला किती मी, काना कोपऱ्यात माझ्या..!
आता भेटलीच आहेस तर थोडी नजर टाकून जा..!
न्याह्याळले तुला किती मी, आणि चाचपले कितीदा..!
दिसलीस आताशी डोळा, तर ये, थोडा धीर देऊन जा..!
तू आहेसच अशी ठिणगी, शांत राहशील कुठे तू..!
'वीज'लेल्या वातीला या, थोडा अंगार तू लावून जा..!
:0pt;margin-bottom:0pt;">नाद लागल्याने तुझ्या ग, झाले कितीक पागल शहाणे..!
शिल्लक राहिलो मी जरासा, शहाणपण तू देऊन जा..!
भल्या भल्यांना तू चढवले, शिखरावरी ग यशाच्या..!
थोडासा मी उभा पायथ्याला, अर्ध्यात तरी घेऊन जा..!
लागली मला आता नशा, 'तुझ्या'तच ग रमण्याची..!
पेल्यात या रिकाम्या, थोडी जादू तुझी भरून जा..!
आता नको वेळ लावूस, नको लपून आत राहूस..!
या संसारी वेंधळ्याला, थोडी उभारी तू देऊन जा..!