कवितेचे एक कडवे
कवितेचे एक कडवे
1 min
165
कवितेच्या एका कडव्यात
बाप कधीच मावत नाही
शोधून शोधून थकलो तरी
कणभरही हाती गावत नाही.
कवितेच्या एका कडव्यात
माया आईची कशी शोधावी
डोंगराएवढ्या खस्ता तिच्या
चारोळीत ती कशी बसावी.
कवितेच्या एका कडव्यात
बायको मात्र अँडजस्ट करते
थकल्याभागल्या कवितेसारखी
तीही आपसूक कवेत येते.
कवितेच्या एका कडव्यात
लपलेले आहे अवघे सार
आख्ख्या कवितेचा सारा भार
पेलून नेतात हो ओळी चार.
