STORYMIRROR

kishor zote

Inspirational

4.0  

kishor zote

Inspirational

क्षण (सहाक्षरी)

क्षण (सहाक्षरी)

1 min
11.6K


हातून सुटतो

अलगद क्षण

राही डोईवर

मग एक ऋण


हिशोब क्षणाचा

लिहावा कशाला?

गुंता तो मनाचा

दाखवा कोणाला?


वेळीच सांगावे

जे काही मनात

तुटतात स्वप्न

एकाच क्षणात


किंमत वेळेची

ज्याने ओळखली

पाहा काळावर

मात त्याने केली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational