जल्लोष (सहाक्षरी)
जल्लोष (सहाक्षरी)


मित्रांचा मेळावा
जमतो जीवनी
क्षण आनंदाचे
जातात रंगोनी
काम फत्ते होवो
की जिंको सामना
मैत्री चढाओढ
शुभेच्छा कामना
सांज ढळताना
एकच तो नारा
डोळ्यातून वाहे
आनंदाच्या धारा
जल्लोष करण्या
घ्यावी उंच उडी
पराजयावर
व्हावी कुरघोडी