गळचेपी कामगारांची
गळचेपी कामगारांची
मालक नि कामगार, दोघे उद्योगाची चाके
मालक कायम श्रेष्ठ, कामगार कायम वाके (1)
मालकी हक्क मालकाने, जपूनच वापरावे
नाते उभयतांचे, मैत्रीचेच असावे (2)
नित्य व्यवहार उलटाच, कामाचा तगादा नित्याचाच
काही बोलायची सोय नाही, वरचष्मा मालकाचाच (3)
कधी कामाचे प्रचंड ओझे, कधी राबवी ज्यादा तास
ओव्हरटाईमचा तुकडा, कुत्र्यासम कामगारांस (4)
युनियन लीडरही, धमकी जोराची देतसे
एवढे झाले पाहिजे, ठणकावून सांगतसे (5)
संप पुकारला तर, टाळेबंदी ठरलेली
कामगाराच्या घरी, चूल नसे पेटलेली (6)
मजबूर कामगार, नेत्याला विनविती
काम सुरु करु आता, घरी अन्नान्न स्थिती (7)
मालकाच्या जाचक अटी, नेताही मानी नाईलाजाने
पुन्हा कामाची चक्रे फिरती, कामगार शोषण पुन्हा नव्याने!! (8)