दिस सरतच नाही !
दिस सरतच नाही !


दिस सरतच नाही, सांज रेंगाळत राही
रात ही तशीच, सरता सरतच नाही,
दिस सरतच नाही,
पहा आज अशी कशी, परिस्थिती सर्व झाली
करोनाच्या भितीने, घरांत दयनीयता बघ आली
दिस सरतच नाही,
अडकले जग पुरते, थांबले व्यवहार ते देशात
नाही दळणवळण कुठे, नाही ऊत्साह कुणात
दिस सरतच नाही,
भयाण शांतता अशी सारी, घरोघरी दाटलेली
माणसाला माणसाची, मनात भिती वाढलेली
दिस सरतच नाही,
देवा सांग आता तरी, हे थांबवणार तू कधि
करोना पासून माणसांची, सुटका करणार कधि
दिस सरतच नाही,
कोंडमारा माणसांचा, देवा थांबव आता तरी
जगू दे मोकळं, आम्ही विहरू फुलपाखरां परी
दिस सरतच नाही,