STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

0.7  

Rajesh Sabale

Others

||धूळ पेरा||

||धूळ पेरा||

1 min
28.8K


धूळ पेरा करण्यासाठी, बैल तिफण ओढतो।

शेतकऱ्याच्या मनात, मेघ आकाशी दिसतो।।

 

भर तापल्या उन्हात, धूळ पेरणी करितो।

येईल पाऊस म्हणून, बीज शेतात गाडतो।।

दाणा अंकुरण्यासाठी, बीज निजल शेतात।

कधी पाऊस पडलं, खंत उगीच मनात।।

शेतकरी राजा माझा, रोज शेतात राबतो।

दोन बैलाची जोडीनं, लई खुशीत राहतो।।

 

त्याच्या खुशीच गुपित, ऊन पावसाच्या हाती।

निळ्या आकाशाच्या अंगणी, घन गर्जत येती।।

ज्वारी, बाजरीचं पीक, कसं डोलतं खुशीत।

वालवड काकडीचा, कसा जमलाय बेत।|

वीज कडाडत जाता, लख्ख प्रकाश पडतो।

वादळात पावसाचा, जणू नगारा वाजतो।।

 भात शेतातून वाहे, पाणी पावसाचं थेट।

वालवड काकडीचा, कसा जमलाय बेत।।

अशी साथ पावसाची, दर वरसाल मिळू दे।

बळीराजाच्या शेतात, पीक मोत्याचं पिकू दे।।

पहिल्या पावसाच्या आधी, हाती तिफण धरतो।

जसं तापल्या तव्यावर, कोणी भाकरी भाजतो।|


Rate this content
Log in