STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

दादा

दादा

1 min
40.9K


मजुरांचा त्राता

कामगारांचा नेता

गरजूंसाठी दाता

असे आमचे 'दादा'

होय

आम्ही भावंडं

दादाच म्हणायचो वडिलांना

सगळा गावच

दादा बोलवायचा त्यांना

'दादा' म्हणजे मोठा भाऊ.

साऱ्या गावाची हाक

सार्थकी लावली

माझ्या वडिलांनी

महिन्याचा पगार

आणलाच नाही कधी घरी

घेऊन दिली पुस्तके कुणा

कुणाच्या लेकीचा

उभारला संसार

स्वतः जागून रात्रभर

पूर्ण केले कुणाचे उपचार

बाजारातील जिलेबीचे पुडके

सुटायचे शेजारच्या दारात

गोड खाऊ खाऊन

भूरी हसायची गालात

कितीक आठवणी

सांगू मी दादांच्या!

डोळ्यातून वाहू लागती

धारा आसवांच्या!!

जरी आज नाही

दादा हयात

माझी ओळख

त्यांच्याच नावात.


Rate this content
Log in