STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

चल ! सच्चा माणूस होऊ गड्या .

चल ! सच्चा माणूस होऊ गड्या .

1 min
1.0K


मी ही वंचित

तू ही वंचित

भाग्याचे संचित

नाही गड्या ...


मी ही दुर्लक्षित

तू ही दुर्लक्षित

चूक त्यांची

नाही गड्या ...


माझाही हेतू शुध्द्

तुझाही हेतू शुध्द्

का मग ताळमेळ

नाही गड्या ....


मी ही प्रामाणिक

तू ही प्रामाणिक

कुठली दरी अनामिक

आहे गड्या ....



तू ही अनामिक

मी ही अनामिक

मग भेट कधी , कुठे ?

होईल गड्या ....


तुझा हेतू निश्चित

माझाही निश्चित

किंचित शंका

नाही गड्या ....


मी माणूस

तू ही माणूस

चल ! सच्चा माणूस

होऊ गड्या ...



Rate this content
Log in