चिंब झाल्या भावना..
चिंब झाल्या भावना..


ती अप्सरा नव्हतीच म्हणा,
परी भुललो तियेच्या गुणां.
अन्नाचा मज घास जाईना,
अन् कशातच मम मन रमेना,
तिच्या प्रेमातच पडलो म्हणा ना....!
तिने कधीच नाही केल्या खाणांखुणा,
मीही कधीच 'ते' प्रगट केले ,ना.
परी नाही शिवली मज तिजविषयी वासना,
पाहावेसे मात्र वाटे तिला पुन:पुन्हा
एनढाच काय तो मम ह्रदयाने केला गुन्हा
नाही केली कधी तिची प्रतारणा,
चिठ्ठीने वा मुखाने उलघडल़्या ना भावना.
का मी डरत होतो न जानता तिच्या भावना.
मजविषयी असोत काहीही तिच्या भावना,
वाटे माझीया सुखाची,यशाची ती प्रेरणा.
शब्दांतून या अवतरल्या,चिंब झाल्या भावना
नाहीच असे नाही ,तिची
आठवण येईल मज पुन्हा
चावट मन करील पुन्हा तिची कामना,
वाटते असावी ती सदा सुहास्यवदना.
सुखी असु देत,जिथे ती,देवा तिला,
ह्रदय करी हीच एक ....कामना.