STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

छंद अक्षरांचा

छंद अक्षरांचा

1 min
179

वाचता वाचता जडला 

मनाला छंद अक्षरांचा.


तुटणारच नाही असा 

जुळला बंध अक्षरांचा.


वाहत्या विचारांना बरा

कधीही बांध अक्षरांचा.


रमविण्या जीवाला पुरे

सोहळा धुंद अक्षरांचा.


मनामनाला करतो प्रसन्न

कस्तुरीचा गंध अक्षरांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational