बहिणाबाई
बहिणाबाई


झाला सफल घेऊनी
जन्म असोदे गावात
बहिणाबाई चौधरी नाव
झळकले साहित्यिकांच्या यादीत
लिखाणात होते
जरी अज्ञान
गात होत्या
ओव्या छान
होता पतीचे निधन
नाही मानली हार
मन गुंतवले कविता
करुनी सणवार,अवजारांवर
त्यांच्या वस्तूसंग्रहालयाला
लोक देती भेट
दर्शन घडते मग
जीवनशैलीचे थेट
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
ऐकताना जीव
पिल्लांमध्ये गुंतला