STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Inspirational Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Inspirational Others

आयुष्य वाया घालायचं नाही

आयुष्य वाया घालायचं नाही

1 min
31

कुण्या देवानं कुणाचं, केलं कधी भलं?

देव देव करण्यात आयुष्याच वाटोळं झालं.


देवळात जाऊन दगडावर किती ठेवावं डोकं

टिंगल करुन,वेडा समजून हसतात सारे लोकं.


रोज उठून उगी देवाला करावं नवस किती ?

पावला नाही देव कधीच, लागेना काहीच हाती.


शेवटी उडाला देवांवरचा कायमचा विश्वास

अभ्यास न करताच परीक्षेत देव करत नसतो पास.


घरातील सारे देवं घेतलं शेवटी डोक्यावर

स्मशानात गाडून त्यांना,टाकली माती त्यावर.


राञदिस राबून केला जिद्दीने खूप अभ्यास

कष्टानं आणलं खेचून शेवटी ते मोठं यश.


साहेब मोठा झालो, कौतुक वाटे सर्वांना

प्रयत्न वाया जात नसतात, जिद्द हवी मना.


प्रयत्न, जिद्दीनेच मानवा मिळतं सारं काही

देव देव करण्यात आयुष्य वाया घालायचं नाही.


तुम्ही मोठं व्हा, लोक तुमच्या चरणी झुकतील,

किर्ती उरेल जगात,तुमचे पुतळे उभे ठाकतील.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy