आपण का जगतो.?
आपण का जगतो.?

1 min

300
ज्याने आणले जगात
सांग,
त्याचा तरी कुठे काय
उद्देश असतो.?
मरमर करतो, ठेवतो
दोन-चार अपेक्षा पण
अपेक्षापू्र्ती आधीच
तोच प्रस्थान ठेवतो
तोही नाही मिळवत उत्तर
शोधून शोधून निरुत्तर
आला तसाच वापस जातो
कोण बोट धरून चालवतो
कोण वाट दाखवतो, तर
कोण जाताना वाटेला लावतो
अरे आलास तर जग ना
उघड्या डोळ्यांनी बघ ना
कधी ठगव कधीतरी ठग ना
कशाने कुठे काय फरक पडतो?
तरीही म्हणे, आपण का जगतो?