आई बाबा
आई बाबा
1 min
126
नऊ मास उदरात
वाढवी माय माऊली
दोन नाजूक त्या जीवास
लाभे पित्याची सावली
करून रक्ताचे पाणी
पान्हा पाजे लेकरास
कस विसरून चालेल
सांगा आईच्या त्यागास
बाबा बोटास धरुनी
पाऊल टाकाया शिकवी
कष्ट करून अपार
घास सुखाचा भरवी
आई बाबा असतात
प्रेम वात्सल्य आगर
नाही आटणार माया
असा ममत्व सागर
नका विसरू कधीही
पांग हे आई-बाबांचे
सेवा करुन तयांची
पुण्य मिळवा चारिधामाचे
जगी तोच खरा सुखी
आईबाबा ज्या हो घरी
जिथे जन्मदात्यांचा अनादर
भरभराट नसे त्या दारी