Amrapali Ghadge

Others

3  

Amrapali Ghadge

Others

विठुराया

विठुराया

1 min
193


नको नको विठुराया

रुसू असा मजवरी

तळमळ या भक्ताची

जान तू बा लवकरी 


 ध्यान सावळे ते तुझे

 हृदयी माझ्या विराजते

ध्यानीमनी ओठावरी

नाम तुझे मीं जपते


 माय माऊली तू माझी

भाव मनीचे घे समजुनी

 दर्शन देण्या या भक्तास

विठू ये सत्वरी धावुनी


 तुझ्याविना देवा नसे

मज मायेची सावली

वेड्या भक्ताची तूच रें 

 तू बा तू माय माऊली


 अंत नको पाहू देवा 

 घे भक्तांला जानुनिया

 चरण स्पर्श करण्यासाठी

माझा जीव रे आसुसला


Rate this content
Log in