गैरसमज
गैरसमज
1 min
141
कानाने एकावे जे अन्
तेच डोळ्यांनी पहावे
गैरसमजाच्या वाटेने
मनुजा तु न चालावे
कधी महाप्रलय बनतो
कधी सोसाट्याचा वारा
विषारी गैरसमज करी
नात्यांचा विध्वंस सारा
बहरलेल्या नात्यालाही
क्षणात येते मग मरगळ
स्वार्थ साधण्यासाठी का
खोटीच ओकावी ती गरळ
"ऐकावे अन् द्यावे सोडून"
हाच मंत्र ध्यानी ठेवा
शांत संयमाने वागून
वेशीला टांगा हेवादेवा
खरेपणाची कास धरुनी
निवास करावा मनामनात
राग, निंदा, मत्सर, द्वेष
थारा नसावा यांना जीवनात