लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत॥1॥
त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥
कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥2॥
मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥3॥
तुका ह्मणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥4॥