साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥1॥
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥2॥
ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥3॥
तुका ह्मणे शहाणा होइप रे गव्हारा । चोरयासीचा फेरा फिरों नको ॥4॥