बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया ।
बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया ।
बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥1॥
मागुता दुर्वास पुसे बिळराया । निरोप जावया देइप देवा ॥ध्रु.॥
बळी ह्मणे त्यासी जाय मी न ह्मणें । जाइऩल नारायण लागला ची ॥2॥
मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका ह्मणे पाय न सोडीं मी ॥3॥