STORYMIRROR

Savita Kale

Tragedy Others

3  

Savita Kale

Tragedy Others

दुष्काळ एक समस्या

दुष्काळ एक समस्या

1 min
569

दुष्काळाचा राक्षस थैमान असा घाली

निसर्गाचे रूप साजिरे, कलंक तया लावी

वाभाडे काढी तीक्ष्ण नखाने धरणीमातेची

गेली भंगूनी, कुरूप काया झाली आता तिची


निसर्गाचा हिरवा शालू, जीर्ण झाला सारा

चिवचिवणा-या चिमण्यांना नाही उरला निवारा

तान्ह्या- तान्ह्या पोरांचं पोट जाई खपाटीला

पान्हा सुध्दा फुटेना आता, उपाशी त्या आईला


वाघाने अर्धी शिकार करूनी

हरणा सोडिले तडफडण्या

तसेच जीव हे राही भटकुनी

उपाशी अन्न पाण्याविना


किडा-मुंगीचे जीवन झाले

जगलो काय अन् मेलो काय

समुद्रही आटला आसवांचा

गोठ्यात मरुन पडली गाय


कुठे कमी पडतो तो पहारा

कसा दुष्काळ करी बसेरा

कुणा करावी आता विनवणी

धावा करण्या त्राण न उरला


Rate this content
Log in

Similar english poem from Tragedy