Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

आपण फक्त भारवाही ...

आपण फक्त भारवाही ...

1 min
1.5K


निवडणुका जाहीर होईल , पुढाऱ्यांचे पीक येईल ..

आमच्या हाती कुठला झेंडा कुणी दिला? का दिला?

याच भान न राहता घरा- घरात कार्यकर्त्यांना ऊत येईल 

धाबे सजतील, जिंदाबाद, मुर्दाबाद करीत गावभर फिरतील

  नाहीच कळणार त्यांना आपण फक्त भारवाही

हात जोडून ते पुन्हा येतील ,आश्वासनाचा पाऊस पाडतील 

बुटासकट पाया पडतील, जाती - पातीच राजकारण करतील 

अन्न , वस्त्र , निवारा , सगळ्यांच्या हाताला काम देऊ म्हणतील 

तीच कॅसेट पुन्हा नव्याने वाजवून खोटे- खोटे स्वप्न दाखवतील 

   नाहीच कळणार त्यांना आपण फक्त भारवाही

अमुक -तमूक, हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ तो आपुला नातेवाईक

भाऊ - दादा, भैया - भाईचं श्रद्धास्थान, आश्रयदाते सिद्ध होईल 

घड्याळाच्या काट्यावर कुणी नाचतील, कुणी हाताची किमया अनुभवतील

तळ्यात - मळ्यात करीत कुणी धनुष्यबाण रोखतील, कुणी जय हो म्हणतील  

     नाहीच कळणार त्यांना आपण फक्त भारवाही.

पटरी सोडून रेल निघेल आश्वासनाचा धूर सोडत गल्लोगल्ल, वाडा वस्ती

धुराळा उडवीत गाड्या पळतील, सत्तेची गणित नव्याने मांडतील ... 

निवडून येणार गुलाल उधळतीळ , अपयशी ठरलेला मदिरेत बुडेल बोका 

दाखवतील ते पुन्हा ठेंगा अन होतील आपुले पुन्हा पाच वर्षासाठी आका

    नाहीच कळणार त्यांना आपण फक्त भारवाही ..


Rate this content
Log in