भाग्यवान
भाग्यवान
1 min
6.4K
असा धुंद होतो तुला पाहतांना
खुले प्रीत ताजी फुले वाहतांना ।।१।।
तुझा हात हाती मला स्वर्ग भासे
जणू राज्य लाभे जगाचेच खासे ।।२।।
नसावा कुणीही असा भाग्यशाली
जयाच्या नशीबी असे तू मिळाली ।।३।।
उदासी मनाची खुलावी कळी ती
गुलाबी सुगंधी असे पाकळी ती ।।४।।
जगी या तयाला कमी काय आहे?
असे थोर मोठा जया माय आहे ।।५।।