दंगली कशाला?
दंगली कशाला?
1 min
1.4K
चित्रकाव्य
( सहाक्षरी )
जात धर्म सारे
खेळ तो मनाचा
खेळ मांडला तो
आज क्रिकेटचा
मने ती जुळती
खेळताना खेळ
दोन या धर्माचा
बसावा तो मेळ
कोण तो जिंकेल ?
कोण रे हारेल ?
चुरस कशाला ?
आनंद घेईल
विटाच्याच यष्टया
कोण उडविल ?
यष्टीमागे कोण
झेल तो घेईल ?
अल्ला आणि राम
असे खेळतील !
दंगली कशाला ?
मग घडतील !!