गणपती आले !!
गणपती आले !!
आले रे आले गणपती आले
उंदरावरती बैसोनी आले
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
स्वागत तुमचं घरात आमच्या
गणपती बाप्पा मोरया
वक्रतुंड हे रूप मनोहर
एकदंत जरी सुरेख सुंदर
विशाल कर्ण तरी बाळी बरोबर
नाजूक नेत्रांवरी मध्येच सिंदूर
विराजमान हे झाले लंबोदर
आले रे आले गणपती आले
उंदरावरती बैसोनी आले
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
स्वागत तुमचं घरात आमच्या
गणपती बाप्पा मोरया
कटी पितांबर शेला भरजरी
अलंकार सुवर्ण लेवून अंगावरी
हाती मोदक, लाडू बरोबरी
घेउनी तांब्र फुलांचे हार अंगावरी
विराजमान झाली लंबोदर स्वारी
आले रे आले गणपती आले
उंदरावरती बैसोनी आले
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
स्वागत तुमचं घरात आमच्या
गणपती बाप्पा मोरया
दुर्वांसह फुलांनी मखर सजले
समईत मंद दिवे लागले
कर्पुर धुपारतीचे गंध विहरले
टाळं मृदुंग ही घुमू लागले
विराजमान लंबोदर हे झाले
आले रे आले गणपती आले
उंदरावरती बैसोनी आले
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
स्वागत तुमचं घरात आमच्या
गणपती बाप्पा मोरया