STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

...अन् माशी इथेच शिंकली!

...अन् माशी इथेच शिंकली!

1 min
786


गोऱ्या गोमट्या मुलाने

खास मैत्री साठी हात पुढे केला

तर आमच्या मनात आलं

ह्यात काहीतरी काळबैरं आहे

नाहीतर हा भुरा

काळ्या कलोटी पुढे हात

का पसरवणार?


... अन् माशी इथेच शिंकली

अन् होता होता आमच पहिलं प्रेम इथेच विरलं


काला कलोट्या मुलाने

रस्तात आडवा येवुन आमच्या पुढे

खास मैत्रीचा प्रस्ताव पुढे ठेवला

तर आमचा ईगो खुप दुखला

आणि त्याला म्हटंल

जा आरश्यात थोबाड बघ आपल कोळश्या


...अन् माशी इथेच शिंकली

अन् होता हंता आमच पहिलं प्रेम इथेच विरलं


उंच-बुटका,श्रिमंत-गरीब

वयाने लहान-मोठा

शिकलेला-कमी शिकलेला

विचारांनी पुढारलेला- न पुढारलेला

अशी विरोधाभासांची मालीका

सुरुच राहीली


...अन् माशी इथेच शिंकली

अन् होता ओता आमच पहिलं प्रेम इथेच विरलं


ही अपेक्षा,अन् ती अपेक्षांच

मारोतीच्या शेपट्या सारखं

अपेक्षांचे ओझे संपता संपत नव्हते


...अन् माशी इथेच शिंकली

अन् होता होता आमच पहिलं प्रेम इथेच विरलं


रंगरुप, कल्पनेतले विरोधाभास

गळून कसे पडतील

एकमेकान बद्दलची अनामिक ओढीने

मनात प्रेम रंगाने नव चित्र

कस साकारल जाइल?

अन् माशी न शिंकता

आमच पहिलं प्रेम कस होइल?


...कस होइल?


Rate this content
Log in