भांडण
भांडण
1 min
7.4K
माझे माझ्याशी होत गेले भांडण
समजावत होते मला माझ्यातले एकाकीपण...
""इतकं टोकाचं वागू नये..थोड नमत घ्यावं,
सुखाच्या कुपीत मिटलेल्या दुःखाने माझं सांत्वन करावं""
गाठी घालणं सोपं होतं
उलगडणं होत गेलं कठीण
आणि समाधानी धाग्याला
अपेक्षेच होतं गोंदण..
भवतीच सारं मनासारख
पण अपुर्णतेचं चढलं लेपण..
माझ माझ्याशीच झालेलं भांडण
माहीत नव्हतं मला..
मीच मला घातलेल होतं
समाधानाचं कुंपण !