Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

डाव

डाव

1 min
318


जीवनाच्या रंगमंचावर

डाव रंगवायचा आपला

चेहऱ्यावर चेहरा एक

थर जणू तो लेपला


तीन अंकाचे नाटक

जणू पहिला बालपण

होत असे लाड फार

घरदार जाई आनंदून


दुसऱ्या अंकात तरुणाई

ना उद्याची फिकीर ना परेशानी

मनमौजी जगणे असे

क्षणभंगुरतेत विरुनी


शेवटचा अंक म्हातारपण

ठेवा नव्या पिढीसाठी

अधिक वजा करताना

रिते हात कोणासाठी?


प्रत्येकाने रंगमंची या 

खेळ तो खेळायचा

आपला डाव संपला

दुसऱ्या हाती सोपवायचा


Rate this content
Log in